चंदगड तालूका संघाच्या वार्षिक सभेत बोलताना चेअरमन राजेश पाटील व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
अवसायानात गेलेल्या चंदगड तालुका संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार मिळविला आहे.
संघाची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या पुढे न्यायचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. महापूर, कोरोना काळात जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. संस्थाकेवळ नफा मिळविण्यासाठी नसतात तर समाजसेवा करत असतात. हे तालुका संघाने दाखवून दिले. संघाने आता कात टाकली असून कोल्हापूर जिल्ह्यात शाखा विस्तारासाठी संघ सज्ज झाला आहे. संघाच्या आजच्या प्रगतीत शेतकरी, सभासद, कर्मचारी आणि ग्राहकांचे अनमोल योगदान लाभल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. चंदगड तालुका शेतकरी खरेदी - विक्री संघाच्या वतीने हलकर्णी फाटा येथे आयोजित केलेल्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राजेश पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालकीची दौलत असावी, यासाठी नरसिंगराव पाटलांनी आपले बलिदान दिले. दौलतला ते स्वत:चे मुल समजत. तो दौलत कारखाना सभासद, शेतकऱ्यांच्या मालकीचा करणे, हेच नरसिंगरावांचे उचित स्मारक असून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.
संघाचे व्यवस्थाापक एस. वाय. पाटील यांनी प्रास्ताविकात संघाची यशस्वी घोडदौड सुरू असून १५ शाखांचे व्यवहार एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले. यानंतर झालेल्या चर्चेत अनिल सूूरूतकर, बंडू चिगरे भिकू गावडे, भीमराव चिमणे, महादेव प्रसादे, विष्णू पाटील, झि. नि. पाटील आदींनी सहभाग घेतला. प्रत्येक शाखेच्या ठिकाणी इमारत बांधावी, अशी सुचना भिकू गावडे यांनी मांडली. नरसिंगरावांच्या रेंगाळलेल्या स्मारकाबाबत विष्णू पाटील यांनी चिंता व्यक्त केली. कृषि प्रदर्शन भरविण्याची मौलिक सूचना झि. नि . पाटील यांनी मांडली. आभार उपाध्यक्ष पोमाणा पाटील यांनी मानले. यावेळी विठोबा गावडे, अल्लीसो मूल्ला, परशराम पाटील, गोपाळ गावडे, पुंडलिक पाटील, अभय देसाई, राजीव जाधव, जानबा चौगुले, रामचंद्र बेनके, दयानंद पाटील, विजयमाला पाटील, नारायण पाटील आदीं संंचालक उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के वाढ....... चेअरमन श्री. पाटील
संघाच्या यशात सभासद शेतकऱ्याप्रमाणेच कर्मचाऱ्यांचेही योगदान आहे. त्यामूळे याची जाणीव ठेऊन कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ अध्यक्ष राजेश पाटील यानी जाहीर केली. तर सभासदांना देय असलेल्या लाभांश स्वरूपातील ३ लिटर तिळेल गेल्या दिवाळीतच सभासदांना दिल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment