सोनारवाडी येथे दोन गवत गंजीला आग लागून हजारोंचे नुकसान, कशी घडली घटना.......वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2021

सोनारवाडी येथे दोन गवत गंजीला आग लागून हजारोंचे नुकसान, कशी घडली घटना.......वाचा.....

सोनारवाडीत येथे गवत गंजीला लागलेल्या आगीत जनावारांचा चारा जळून खाक झाला. 

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

       सोनारवाडी (ता. चंदगड) येथील दोन गवताच्या गंजीला आग लागून सर्व गवत जळून खाक झाले. भरमु कृष्णा पाटील व सचिन महादेव ठबे यांच्या गवत गंजीला शुक्रवारी (दि. २७ मार्च रोजी) रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. ही आग कोणीतरी अज्ञातांनी लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जनावारांच्या चाऱ्याला आग लावल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या दोन्ही आगीच्या घटनांमध्ये ४५ हजाराचे नुकसान झाले असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment