एसटी बसवर दगड मारून नुकसान केलेल्या हेरे येथील दोघांना शिक्षा - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2021

एसटी बसवर दगड मारून नुकसान केलेल्या हेरे येथील दोघांना शिक्षा

 


चंदगड /प्रतिनिधी : सी एल वृत्तसेवा

 कागल आगाराच्या कोल्हापूर- पणजी बसवर दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवाजी नारायण पवार त्याचा साथीदार सद्दाम मोहम्मदगौस शेख दोघेही रा. हेरे, ता. चंदगड यांना चंदगड येथील न्यायालयाचे न्यायाधीश ए सी बिराजदार यांनी प्रत्येकी १० हजार रुपये दंड, फिर्यादीस ५ हजार तर नुकसानीबद्दल एसटी डेपोस १५ हजार रुपये देणे. असा ४० हजार रु. चा दंड ठोठावला.

 याबाबत हकीकत अशी, यातील फिर्यादी धनाजी परसू तुरुंबे, रा. साके, वाहक एसटी डेपो कागल हे दि. १९ मे २०१४ रोजी कोल्हापूर- पणजी बस घेऊन जाताना मोटणवाडी- तिलारी दरम्यान एका थांब्यावर वडाप व्यवसायिक असलेल्या आरोपी शिवाजी पवार याच्या ट्रॅक्स मधील प्रवासी उतरून बस मध्ये गेले. याचा राग धरून चालक व वाहकाशी बाचाबाची केली. व पणजीहून बस परत येत असताना संगणमत करून आपला साथीदार शेख यांच्यासह एसटी बसवर दगडफेक करुन समोरील काच फोडली यात चालक जखमी झाले होते. त्याची सुनावणी २६ मार्च रोजी चंदगड कोर्टात होऊन भा द वि सं कलम ३३७, ३४, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा कलम ०३ व ७० प्रमाणे शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ बी के हजारे यांनी करून १८ ऑगस्ट २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते.
No comments:

Post a Comment