तूर्केवाडी येथे यूवकाची गळफास घेऊन आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2021

तूर्केवाडी येथे यूवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चंदगड / प्रतिनिधी 

         तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील खडी क्रशर नजीकच्या शेतातील झाडाला रबराने गळफास घेऊन आत्महत्या केली. हणमंत शिवाप्पा लमाणी (वय वर्षे २२ रा. मूरगूड ता.सौदत्ती,जि बेळगाव, सध्या रा.तूर्केवाडी ता.चंदगड) असे मयत यूवकाचे नाव आहे. 

         याबाबत अधिक माहिती अशी कि तूर्केवाडी येथील संभाजी पाटील यांच्या मालकीच्या शेतातील झाडाला खडी क्रशरच्या मोटारीच्या रबरने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबतची वर्दी राजेश तूडयेकर( रा.कोनवाळ गल्ली, बेळगाव)यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे,अधिक तपास हवालदार मकानदार करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.No comments:

Post a Comment