![]() |
निर्भया पथकाने विद्यालयाला भेट दिली. त्याप्रसंगी उपस्थित हवालदार तानाजी पाटील, प्राचार्य एस. जे. पाटील. |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
निर्भया पथकाचा आधार, बनवा जीवन आपले रूबाबदार, या घोषवाक्याखाली गडहिंग्लज उपविभागातील निर्भया पथकाने श्री शिवशक्ती हायस्कूल व न्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे भेट दिली.
यावेळी प्राचार्य एस. जी. पाटील, एन. सुर्यवंशी यांनी स्वागत केले. निर्भया पथकाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संदर्भातील शाळेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या निर्भया पथकातील हवालदार तानाजी पाटील, पो. कॉं. बाबासाहेब सावंत, रणजित पाटील, महेश चिटणिस, महंतेश पाटील आदि जन तर एस. के. हरेर, एस. के. पाटील, डी. एल. पाटील आदि शिक्षक उपस्थित होते. आभार बंकट हिशेबकर यानी मानले.
No comments:
Post a Comment