रविकिरण पेपर मिलचे कामगार करणारा पाणी बंद व ठिय्या आंदोलन, वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2021

रविकिरण पेपर मिलचे कामगार करणारा पाणी बंद व ठिय्या आंदोलन, वाचा काय आहे कारण?

चंदगड / प्रतिनिधी

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिलमधील आंदोलनकर्ते कामगार कंपनीच्या गेटवरच आपल्यावर झालेल्या अन्याया विरोधात २६ मार्च २०२१ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पाणी बंद व ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन चंदगडचे तहसिलदार विनोद रवणरे यांना दिले आहे. 

        ८ सप्टेंबर २०२० पासून रविकिरण पेपर मिलमधील कामगारांचा संप सुरु आहे. मात्र या संपकरी कामगारांच्या मागण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कामगारांवर गेले सात महिने कामगारांची उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व कारणास्तव कामगारांच्यावर होणारा अन्याय आणि वेळ काढू धोरणाच्या निषेधार्थ रविकिरण पेपर मिलच्या गेटसमोर पाणी बंद व ठिय्या आंदोलन तीव्र स्वरूपात करणार आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था आणि शांततेस बाधा निर्माण झाले. रविकिरण पेपर मिलचे व्यवस्थापन कायद्याचा व संविधानाचा अवमान करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. कामगार यांची उपासमार करून व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करत आहे. 


याबाबत कंपनीचे म्हणने जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन संपुर्ण बातमी वाचा.........https://www.chandgadlivenews.com/2021/03/blog-post_465.html

       आंदोलनकर्त्या कामगारांवर खोटे व काल्पनिक गुन्हे दाखल करून अन्याय केला आहे. त्यामुळे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. अशी विनंती निवेदनातून केली आहे.  याबाबतचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे यांना आंदोलनकर्त्यांनी दिले आहे. निवेदनावर तानाजी हुंदळेकर, गणपती भोसले, गणू हुंदळेकर, गोविंद गावडे, परशुराम गावडे, पुंडलिक गावडे, गणपत चौथे, शंकर पवार, रघुनाथ हेमोते, गोविंद जाधव, मुकुंद गावडे, मारुती गावडे, पुंडलिक पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:

Post a Comment