कामगारांनी कायदेशीवर मार्गाचा अवलंब करावा, कंपनी व्यवस्थापनाचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2021

कामगारांनी कायदेशीवर मार्गाचा अवलंब करावा, कंपनी व्यवस्थापनाचे आवाहन

 


चंदगड / प्रतिनिधी

      गेल्या सात महिन्यापासून रविकिरणचे कामगार संपावर आहेत. कंपनीमार्फत कामगारांना अनेक वेळा पत्रव्यवहार करुन कामावर हजर होण्यास आवाहन केले आहे. कंपनीमार्फत कायदेशीर मार्गांचा अवलंब करुन कोल्हापूर येथील कामगार न्यायालयात दावा दाखल केला आहे. आंदोलनकर्त्यां कामगार व त्यांच्या नेत्यांकडून कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता धाकधपटशाही, रास्ता रोको इत्याही मार्गाचा अवलंब सुरु आहे. 


आंदोलनकर्ते कामगारांचे म्हणने जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर बातमी वाचा.....

https://www.chandgadlivenews.com/2021/03/blog-post_757.html


          आंदोनलकर्ते कामगार कामावर येत नाहीत व स्थानिक कामगारांनाही काम करण्यापासून रोखत आहेत. कामावर जाणाऱ्या कामागारांनाही मारहाण करत आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. कंपनीला हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधून होणारा पाणी पुरवठाही बंद करण्याचे पत्रही या कामगारांनी चंदगड तहसिलदारांना दिले आहे. या कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी कामगारांची दिशाभुल करुन कामगारांना कायदेशावीर मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला नाही. वरील सर्व प्रकारे तालुक्यातील औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारे ठरणार आहेत. त्यामुळे तालुक्यात नवीन येणाऱ्या उद्योगांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. याचा तालुक्यातील राजकीय, शासकीय व्यक्तींनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
No comments:

Post a Comment