संत गजानन महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्याकडून रॅली काढून भडगाव व तेरणी येथे लसीकरणाबाबत जनजागृती - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2021

संत गजानन महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्याकडून रॅली काढून भडगाव व तेरणी येथे लसीकरणाबाबत जनजागृती

 

तेरणी येथे महागाव येथील फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी कोवीडच्या लसीकरणाबाबत रॅली काढून जनजागृती करताना. 

सी. एल. वृत्तसेवा, महागाव

        महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पदविका व फार्मसी महाविद्यालयाने तालुक्यातील भडगाव व तेरणी गावात कोवीड लसीकरणाबाबतची रॅली काढून घरोघरी जाऊन माहिती देत नागरिकांतून जनजागृती केली.

           तेरणी येथे झालेल्या प्रबोधनात प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार यांनी `लॉकडाउन कमी झाल्यानंतर कोवीडचा धोका पुन्हा वाढला आहे. अशावेळी बेफिकीर न राहता सर्वांनी दक्षता घेण्याची गरज असून आपण सुरक्षित राहण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. लोकांनी लसीकरणाबाबत गैरसमज करून न घेता बिनधास्तपणे लस घ्यावी असे आवाहन केले.

         भडगाव येथेही पदवीच्या विद्यार्थ्यांनी लसीकरण बाबत प्रबोधन केले. याला ग्रामस्थांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्राचार्य डॉ. अन्सार पटेल, अजिंक्य चव्हाण, प्रा. महादेव बंदी व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच मोहसीन मुल्ला यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment