संत गजानन आयुर्वेदमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2021

संत गजानन आयुर्वेदमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत

संत गजानन आयुर्वेदमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत कार्यक्रमावेळी बोलतानाप्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे. 


सी. एल. वृत्तसेवा, महागाव

   महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात झाला. समारंभाच्याअध्यक्षपदी डॉ. यशवंत चव्हाण हे होते.

   प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांनी विद्यार्थी व पालकाचे स्वागत करुन महाविद्यालयाची प्रगती व गुणवत्तेचा आढावा घेतला. दरम्यान मान्यवराच्या हस्ते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. माधव पटाडे यांनी शिक्षण समुहाकडून सुरु असलेल्या विविध विद्याभ्यासाची माहिती देऊन आयुर्वेदाचे महत्त्व विषद केले. यावेळी गुलाबपुष्प देऊन नवगताचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. चव्हाण यानी येथील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा अधिकाधिक वेळ हॉस्पिटलमधील प्रात्यक्षिकावर भर देणार आहोत. यामुळे येथे घडणारा विद्यार्थी हा उत्कुष्ट डॉक्टर म्हणूनच नावारुपाला येणार आहे. यासाठी महाविद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. संगिता मलाबदे यानी आभार मानले. यावेळी डॉ. अजित मेतके, डॉ.दिग्विजय पाटील, डॉ. स्वरुप कुलकर्णी, डॉ. अस्मिता काबंळे तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment