कुदनुर येथील सिद्धेश्वर हरिनाम सप्ताह साध्या पद्धतीने - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2021

कुदनुर येथील सिद्धेश्वर हरिनाम सप्ताह साध्या पद्धतीने


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

         कुदनुर (ता. चंदगड) येथील सिद्धेश्वर अखंड हरिनाम सप्ताह साध्या पद्धतीने करण्याचे ग्रामस्थ व सप्ताह कमिटी बैठकीत ठरवण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दि. २४ मार्च २०२१ रोजी सुरु होऊन सप्ताहाची सांगता २६ रोजी होणार आहे. तथापि यंदा २६ रोजी होणारा महाप्रसादही रद्द करण्यात आला आहे. सप्ताह काळात केवळ धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. भजन-कीर्तन, दिंड्या सर्व बंद केले असून या काळात बाहेरगावच्या भजन दिंड्या, खेळणी व अन्य दुकानदार यांचेसह भाविकांनी येऊ नये असे आवाहन कमिटीच्या वतीने प्रकाश बुधाजी कसलकर, शिवाजी चुडामणी आंबेवाडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
No comments:

Post a Comment