कोवाड येथील जुना बंधारा टाकतोय कात...आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बंधारा दुरुस्तीच्या कामाला शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2021

कोवाड येथील जुना बंधारा टाकतोय कात...आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बंधारा दुरुस्तीच्या कामाला शुभारंभ

कोवाड येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

      कोवाड (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

      चंदगड तालुक्याच्या वैभवात भर घालणारी ताम्रपर्णी नदीकाठावर कोवाड गाव वसले आहे. याच नदीवर कामेवाडी, दुंडगे, कोवाड, माणगाव सह तालुक्यात १० ते १२ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे गेल्या ५० वर्षापूर्वी शेतीसाठी पाणी अडविण्याच्या उद्देशाने बांधले आहेत.

       मागील दोन वर्षे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूर व काही ठिकाणी बांधण्यात आलेल्या पर्यायी पुलामुळे दुर्लक्षित  झालेल्या बंधाऱ्याच्या डागडुजीचा प्रश हा सद्या ऐरणीवर आला होता. कोवाड येथील बंधाऱ्याच्या पिलर वरील दगड  निखळून बंधारा धोकादायक स्थितीत आला होता. बंधाऱ्याला गळती लागल्याने अडविण्यात येणारे पाणी देखील पूर्ण क्षमतेने रहात नसल्याने या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ति तातडीने होणे गरजेचे होते.याबाबतचे वृत्त सी एल न्युजने प्रसिद्ध केले होते.

        या सर्व परिस्थितीची माहिती घेऊन आमदार राजेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून चंदगड मतदार संघामध्ये एकूण साडे चार कोटी चा निधी हा बिगर सिंचन पाणी पट्टी मधून मंजूर झाला असून त्यातील कोवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४९ लाख मंजूर करुन सदर बंधारा दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ हा शुक्रवारी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

          यावेळी कोल्हापूर दक्षिण पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने,तुषार पवार उप विभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग चंदगड उपस्थित होते. यावेळी आमदार  राजेश पाटील बोलताना म्हणाले , सदर काम पूर्ण झाल्यानंतर याच भागातील कोवाड किणी,कडलगे ,नागरदळे ,कागणी, कालकुंद्री सह अनेक गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे याबरोबरच एकूण ४२५ हेक्टर म्हणजे जवळपास तेराशे एकर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे एकूण ५८दशलक्ष घनफूट पाणीसाठा होण्यास मदत मिळणार असल्याने या पाण्याचा उपयोग शेतीबरोबर पिण्यासाठी होणार आहे .

         यावेळी यावेळी शाखा अभियंता पी एम अर्जुनवाडकर ,कारकून सुहास रेडेकर ,सचिन गावडे कालवा निरीक्षक कोवाड चे माजी उपसरपंच विष्णू आढाव ,अशोकराव देसाई , ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सुतार, सदस्या सुवर्णा कुंभार,नुसरत मुल्ला, सुवर्णा केसरकर-पाटील, कृष्णा बिर्जे,किणी गावचे सरपंच संदीप बिर्जे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

       सदर बंधारा हा कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा असून महापुरामुळे बंधाऱ्याची हाणी झाली आहे.त्यामुळे बंधाऱ्याच्या पाण्याकडील बाजूचे एकूण 26 दगडी प्रस्तंभ काढून त्याठिकाणी आर सी सी कॉन्क्रेट करण्यात येणार असून सदर बाजू ही 82 मीटर लांबीची भिंत देखील आर सी सी करण्यात येणार असल्याचे चंदगड पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी तुषार पवार यांनी सांगितले. 

1 comment:

Unknown said...

Dundage Bandhara pn aahe laksh asudya saheb 🙏🙏

Post a Comment