कानूर येथे गोवा बनावटीची दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2021

कानूर येथे गोवा बनावटीची दारू जप्त

चंदगड / प्रतिनिधी

    कानूर खूर्द (ता. चंदगड) येथे शामराव भिवा चव्हाण यांच्या घरातील पाठीमागच्या छपरात काळ्या बॅगेत लपवून ठेवलेली गोवा बनावटीची ११०९० रूपयांची दारू चंदगड पोलिसांनी जप्त केली.

      शामराव चव्हाण यांच्या घरात गोल्डन अँड ब्लॅक ट्रिपल एक्स रम च्या १४ बाॅटल, गोल्ड आईस ब्ल्यू फाईन व्हिस्कीच्या १२ बाॅटल अशा २६ बाॅटल महाराष्ट्र राज्याचा कर चूकवून अवैध मार्गाने आणल्याने जप्त करण्यात आल्या असून बाजारभावाप्रमाणे या दारूची  ११०९०रू किंमत होते. No comments:

Post a Comment