![]() |
अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर येथे लसिकरण करताना वैघकिय पथक. |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर (ता. चंदगड) च्या वतीने वय वर्ष ४५ पुढील स्त्री व पुरुषांना असे मिळून २२५० जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली.
अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गणूचीवाडी, बोंजूर्डी उत्साळी, मोरेवाडी, सत्तेवाडी, विंझणे, मलगेवाडी, शिरोली, इब्राहिमपूर, गवसे, सोनारवाडी, मुगळी,आमरोळी आदी गावातील व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांनाही लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनाही लसीकरणाचा केले जात आहे. सध्या कोल्हापूर जिल्हाबरोबरच महाराष्ट्रातही मोठ्या प्रचंड संख्येने कोरोना रूग्ण वाढत आहेत. सर्व नागरिकांनी याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, वारंवार हात पाण्याने स्वच्छ धूणे अशी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने वय वर्षे 45 वरील सर्वांनाच मोफत कोरोना डोस देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे अडकूर आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वय वर्ष 45 वरील सर्व नागरिकांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे. ही सर्व सेवा अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रातमूल्य उपलब्ध असल्याने याचा लाभ घेण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे. यासंदर्भात काही अडचण असल्यास आरोग्य केंद्राची संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. सोमजाळ यांनी केले आहे. एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूरच्या योग्य नियोजनामुळे कोविड लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे हे मात्र निश्चित.
No comments:
Post a Comment