चंदगड तालुक्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा चंदगड तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. 13) रोजी जय मल्हार मंगल कार्यालय सुपे (ता. चंदगड) येथे सकाळी ११ वाजता सत्काराचे नियोजन केल्याची माहीती भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिली.
या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी रोहयो मंत्री भरमुआण्णा पाटील अध्यक्षस्थानी असतील. भाजपा प्रदेश राज्यकार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील प्रमुख पाहुणे असतील. गोकुळचे संचालक दिपक पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, उपसभापती मनिषा शिवनगेकर, पं. स. सदस्य बबन देसाई, विठाबाई मुरकुटे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रविंद्र बांदिवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष रत्नप्रभा देसाई, नगरपंचायतीचे गटनेते दिलीप चंदगडकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे, शिनोळी बालाची कॅश्युचे चेअरमन शामराव बेनके, शाहु कॅश्युचे चेअरमन मोहन परब हे उपस्थित रहाणार आहेत. या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड भाजपा महिला तालुकाध्यक्ष समृध्दी काणेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment