अलबादेवी ते उत्साळी फाटा व अडकूर रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करा, ग्रामस्थांचे "बांधकाम"ला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2021

अलबादेवी ते उत्साळी फाटा व अडकूर रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करा, ग्रामस्थांचे "बांधकाम"ला निवेदन

 

ग्रामस्थांच्या वतीने श्रीकांत नेवगे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देताना. 

चंदगड / प्रतिनिधी

       अलबादेवी ते उस्ताळी फाटा व अडकुर हा दोन किलोमीटर अंतर असलेला रस्ता पावसाळ्यापूर्वी पुर्ण करावा अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे   

       गेल्या महिन्यात साधारण अडकूर बाजूने तीन किलोमीटर अंतरावर  डांबरीकरण झाले असुन बाजुने झालेले आहे. वास्तवीक पाहता अलबादेवी गावच्या बाजूचा रस्त्यांची अवस्था दैयनिय झाली आहे. त्यामूळे वाहतुक धोकायदायक बनली आहे.  त्यामूळे अपघातला निमंत्रण मिळत आहे. या संदर्भात गेल्या तीन चार वर्षापासुन आंदोलन, उपोषण, त्याचबरोबर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार प्रांताधिकारी  यांनी देखील मागिल महिन्यात आपल्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामूळे प्राधान्य क्रमानुसार अलबादेवी ते अडकुर हा दोन किमी चा रस्ता व अलबादेवी ते उस्ताळी फाटा हा एक किमी अंतरचा रस्ता दुरूस्त करावा अशी  मागणी ग्रामस्थांनी  केली आहे.

      निवेदनावर श्रीकांत नेवगे,उपसरपंच राजाराम पाडले, यशवंत घोळसे, परशराम चौकुळकर, सुभाष इंगवले,नामदेव नेवगे, मारुती डांगे आदीच्या स्वाक्ष-या आहेत.No comments:

Post a Comment