डेरवण, रत्नागिरी येथील राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य तुपारे व मार्गदर्शक शिक्षक.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
डेरवण (जि. रत्नागिरी) येथील विठ्ठलराव जोशी चारिटी ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयाने मोठे यश मिळविले. धावपट्टू प्रथम पांडुरंग पाटील (इयत्ता नववी) याने ४०० मीटर धावणेत द्वितीय क्रमांक पटकावला. चंदीगड (पंजाब) येथेही नुकत्याच झालेल्या २००० मीटर धावणे स्पर्धेत महाराष्ट्र संघातून त्याने चमकदार कामगिरी केली होती.
डेरवण मधील या स्पर्धेत सुमीत बंडू पाटील (इयत्ता आठवी) याने ४०० मिटर धावणेत चौथा क्रमांक पटकावला. याशिवाय उंच उडी, लांब उडी आदी क्रीडा प्रकारात सुनील पाटील, भरमेश कांबळे, हर्षल कांबळे, अंकुश कांबळे यांनी कौतुकास्पद यश मिळविले. याबद्दल प्राचार्य व्ही. जी. तुपारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी ॲड. एस आर पाटील, गजानन पाटील आदींची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक प्रा. डी.एम. तेऊरवाडकर, एन. जी. बाचुळकर, ई. एल. पाटील आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment