आमरोळीतील धोकादायक विद्युत डिपी बदलण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

आमरोळीतील धोकादायक विद्युत डिपी बदलण्याची मागणी

 

आमरोळी येथे धोकादायक स्थितित असलेली डिपी .

अडकूर = सी .एल. वृत्तसेवा

आमरोळी (ता . चंदगड ) येथील पोरेवाडी . क्रॉसला धोकादायक ठिकाणी असणारी विद्युत डिपी दुसऱ्या ठिकाणी बदलण्याची मागणी आमरोळी ग्रामस्थानी केली आहे .

     आमरोळी येथे मराठी विद्यामंदिर समोर पोरेवाडी क्रासला पाण्याच्या टॉकीजळ उच्च दाबाची महावितरण कंपनिने विद्युत डीपी बसवलेली आहे . या ठिकाणी चार दिशा कडून आलेले रस्ते एकत्र मिळतात . तसेच येथेच मराठी विद्यामंदिर असल्याने लहान मुलांचा सतत वावर असतो . त्याचबरोबर या डिपीचे खांबे वाकल्याने धोका निर्माण झाला आहे . अगदी धोकादायक ठिकाणी असणारी ही डिपी तात्काळ बदलण्यात यावी अशी आमरोळी ग्रामस्थानी महावितरण कंपनिकडे केली आहे. 

No comments:

Post a Comment