चंदगड नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार बंद - मुख्याधिकारी श्री. जगताप यांचा आदेश - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

चंदगड नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार बंद - मुख्याधिकारी श्री. जगताप यांचा आदेश


चंदगड / प्रतिनिधी

     महाराष्ट्रात व कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  कोरोनाची साखळी ब्रेक करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार चंदगड नगरपंचायत हद्दीतील गुरुवारचा आठवडी बाजार बंद यावा. अशा आशयाचे प्रसिध्दी पत्रक नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी प्रसिध्दीला दिले आहे. 

     कोरोनाला रोखण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नगरपंचायत पातळीवर सद्यस्थितीला गुरुवारचा आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे. तसेच भाजीपाला, किराणा, मेडिकल, हॉस्पिटल इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची दुकाने बंद राहतील. धार्मिक व लग्नकार्य शासनाच्या निकषानुसार करावीत. यामध्ये काही हयगय केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असा आदेश चंदगड नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी दिला आहे. 
No comments:

Post a Comment