'स्वामी' कार रणजित देसाई जयंती दिनी केंद्रशाळा कोवाड येथे अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

'स्वामी' कार रणजित देसाई जयंती दिनी केंद्रशाळा कोवाड येथे अभिवादन

केंद्र शाळा कोवाड येथे थोर साहित्यिक स्व. रणजित देसाई यांच्या जयंतीनिमित्त फोटो पूजन प्रसंगी केंद्रप्रमुख, केंद्र मुख्याध्यापक, मुख्याध्यापक व शिक्षक

कोवाड : प्रतिनिधी

       ख्यातनाम मराठी साहित्यिक 'स्वामी' कार पद्मश्री रणजित रामचंद्र देसाई यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्म गावातील केंद्रशाळा कोवाड, ता. चंदगड येथे आदरांजली वाहण्यात आली. प्रभारी केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर व केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

       रणजित देसाई यांच्या स्वामी, श्रीमान योगी, राजा रविवर्मा, पावनखिंड आदी  तुफान लोकप्रियता लाभलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांना साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. याशिवाय त्यांच्या अन्य कादंबऱ्या, नाटके, कथासंग्रह आदी अजरामर लेखन साहित्याने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे कोवाड गाव व परिसरासह चंदगड तालुका, कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पातळीवर ओळख मिळाली आहे असे प्रतिपादन केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले. सुधीर मुतकेकर, सुनील कुंभार आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी केंद्रातील प्रेमिला बामणे, श्रीकांत सुबराव पाटील, बसवाणी शिरगे, ए के पाटील, प्रकाश नांदुडकर, सुवर्णा आंबेवाडकर, नारायण कोकितकर, कविता विष्णू पाटील आदी मुख्याध्यापक, सुनिता राजगोळकर, लक्ष्मण बामणे व केंद्र शाळा कोवाड येथील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

No comments:

Post a Comment