कोवाड आरोग्य केंद्र वैद्यकिय सेवेत अग्रेसर - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

कोवाड आरोग्य केंद्र वैद्यकिय सेवेत अग्रेसर

कोविड लसीकरण प्रसंगी आरोग्य केंद्रातील कर्मचारी.


कोवाड- सी .एल. वृत्तसेवा

कोवाड ता . चंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून विविध वैद्यकिय सेवा चांगल्या प्रकारे पुरविण्यात येत आहेत .

येथील कुटूंब कल्याण शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट १०० टक्के पुर्ण करण्यात आले आहे . त्याबरोबरच कोरोना कोविड लसीकरणाचे काम अतिशय वेगाने व शिस्तबद्धपणे केले जात आहे . ०३ मार्च २०२१ पासून कोरोना कोविड लसीकरण सुरु असून आज अखेर चंदगड , गडहिंग्लज , आजरा तालुक्यात सर्वात जास्त 8290 लाभार्थीना कोरोना लसीकरण देणेत आले आहे . या सर्वाचे श्रेय प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाडचे वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रसन्न चौगले यांचे आहे . तसेच कार्यक्षेत्रातील सर्व आशा स्वंयसेविका , आरोग्य सेविका ,आरोग्य सेवक , डाटा ऑपरेटर या सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोना लसीकरणाचे काम अत्यंत उत्कृष्ट चालू आहे . याबरोबरच या आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर आप्पासाहेब बामणे व चालक सदैव तत्पर सेवा देत असल्याने येथील रुग्णाना दिलासा मिळाला आहे. 




1 comment:

Post a Comment