लकीकट्टेचे अधिकारी नागोजी राजगोळकर यांना पत्नीवियोग - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

लकीकट्टेचे अधिकारी नागोजी राजगोळकर यांना पत्नीवियोग

 

चंद्रभागा नागोजी  राजगोळकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा
मूळच्या लकीकट्टे (ता. चंदगड) व सध्या भारत कॉलनी, कणबर्गी रोड, बेळगाव येथील चंद्रभागा नागोजी  राजगोळकर उर्फ
 राजगोळे (वय 61) यांचे  गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बेळगाव येथील बीएसएनएलचे  निवृत्त अधिकारी नागोजी राजगोळकर उर्फ राजगोळे  यांच्या त्या पत्नी, शिनोळी येथील ट्रेडिंग कंपनीचे मालक दत्तात्रय राजगोळे 
 व स्वीडन येथील सॉफ्टवेअर इंजिनियर दयानंद राजगोळे यांच्या त्या मातोश्री होत.  बेळगाव येथील व्यवसायिक सुरेश डी. राजगोळकर यांच्या त्या काकी होत. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे.


No comments:

Post a Comment