दुचाकी व कार अपघातात तुर्केवाडीचे दोघेजण जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

दुचाकी व कार अपघातात तुर्केवाडीचे दोघेजण जखमी

 


चंदगड : वृत्तसेवा 

तूर्केवाडी फाटा (ता. चंदगड) येथील पेट्रोल पंपावरून तुर्केवाडी गावाकडे जात असताना दुचाकी व कार यांच्यात अपघात होऊन दोघे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले. धोंडीबा रामू गावडे व शांताराम कृष्णा गावडे हे दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. घटनास्थळी पाटणे फाटा पोलिस चौकीचे पी एस आय दिलीप पवार व जमीर मकानदार यांनी पाहणी केली. चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती शांतारामबापू पाटील यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यानंतर सदर जखमीवर शासकीय रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवण्यात आले.


No comments:

Post a Comment