चंदगड तालुक्यातील कोरोना लसीकरणाचे 65 टक्के उद्दिष्ट पूर्ण, वाचा किती जणांनी घेतली लस.... - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

चंदगड तालुक्यातील कोरोना लसीकरणाचे 65 टक्के उद्दिष्ट पूर्ण, वाचा किती जणांनी घेतली लस....

 

लसीकरणाचे संग्रहित छायाचित्र

नंदकूमार ढेरे, चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ८ एप्रिल पर्यंत चंदगड तालुक्यात ३७ हजार ४४३ नागरिकांना कोरोनाची आरोग्य विभागामार्फत कोरोना ची लस देण्यात आली. चंदगड तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र ५ उप केंद्र अशा अकरा ठिकाणावरून लस देण्याचे सुरू आहे आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य केंद्रातुंन कोव्हिड लसीकरण ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.तालुक्यात एकूण ६५ टक्के लसीकरणाचे काम झाले आहे ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पोलिस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी संयुक्तिक जनजागृती करण्याची गरज आहे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या ११४४, ४५ ते ५९ वयोगटातील १४०२७, ६० वर्षावरील २०४६२ व हेल्थ वर्कर ११४४ अशा एकूण३७४४३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्याची एकूण १,८६,०५३ लोकसंख्या असून लसीकरणासाठी ५७८३६ इतके उद्दिष्ट आहे. ग्रामीण रुग्णालय सह कोवाड माणगाव, हेरे, कानूर, अडकुर तूडये या प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागणवाडी, कारवे, शिनोळी, कालकुंद्री, पाटणे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे पहिल्या टप्प्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या प्रमाणीत असलेल्या चंदगड तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण संख्याही अद्याप आवाआकात आहे. मात्र पूणे, मुंबई येथील चाकरमानी गावी परतल्यास धोका वाढण्याची शक्यता आहे

लसीकरणाला सर्वांनी साथ देण्याची गरज आहे लस पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे ४५ ते ६० वर्षावरील नागरिकांनी लस घेऊन आपली प्रतिकार शक्ती वाढवावी "मला काय होतंय" असे समजून लसीकरणा कडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढणाल आहे. त्यामुळे ४५ ते ६० वर्षावरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी.

          डॉ ए.जे. पठाणे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, माणगाव)
No comments:

Post a Comment