त्या' चरींचा नागरिकांना 'महाताप' सुरूच खुदाई केलेल्या चरी सहा महिने उघड्याच - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2021

त्या' चरींचा नागरिकांना 'महाताप' सुरूच खुदाई केलेल्या चरी सहा महिने उघड्याच

महानेटच्या चरीमुळे कागणी कालकुंद्री रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यातून वाट काढणारी वाहने व नागरिक.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
  चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात 'महानेट' केबलसाठी जेसीबी मशीन ने मारलेल्या धोकादायक चरी सहा महिने होत आले तरी उघड्याच आहेत. या चरी कागणी- बेळगाव तसेच कागणी, कालकुंद्री- राजगोळी मार्गावर अपघातांना आमंत्रण देत आहेत. संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईबाबत प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    केंद्र शासनाच्या महत्वकांशी 'महानेट सेवा' केबल टाकण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून चांगले रस्ते उकरून चरी मारल्या आहेत. केबल टाकून त्या तात्काळ मुजवण्याची गरज असताना सहा महिने झाले तरी ठीक ठिकाणी तशाच आहेत. ऐन वळणांवरील या चरींमुळे दुचाकी चारचाकी वाहनांचे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तर चांगले रस्ते खराब झाले आहेत.  कालकुंद्री नजीकच्या चरीमुळे  रस्त्यात पाणी साठून वाहने चालवण्यासह पायी जाणेही कठीण झाले आहे. याचे सोयरसूतक महानेट कंपनी किंवा ठेकेदाराला दिसत नाही. याबाबतच्या तीव्र लोक भावना लक्षात घेऊन ठेकेदाराने चरी तात्काळ मुजवून रस्ता निर्धोक करावा अशी मागणी होत आहे.





No comments:

Post a Comment