किटवडे येथील अमृत देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2021

किटवडे येथील अमृत देसाई यांचे निधन

 

अमृत आबाजी देसाई

कागणी :  सी. एल. वृत्तसेवा
      किटवडे (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक अमृत आबाजी देसाई  (वय-९३) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. १२) निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोवाडचे सेवानिवृत्त केंद्र मुख्याध्यापक गुंडोपंत देसाई (कागणी) यांचे ते सासरे होत. दिवस कार्य गुरुवार दिनांक २२ एप्रिल रोजी होत आहे. त्यांचा गावातील प्रत्येक कामात हिरारीने सहभाग होता. सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.


No comments:

Post a Comment