दौलत- अथर्व ची सर्व ऊस बिले शेतक-यांच्या खात्यावर जमा - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2021

दौलत- अथर्व ची सर्व ऊस बिले शेतक-यांच्या खात्यावर जमा

मानसिंग खोराटे


चंदगड / प्रतिनिधी

हलकर्णी ता.चंदगड येथील दौलत-अथर्व साखर कारखान्याचा सन २०२०-२२ या गळीत हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण उसाची बिले शेतकर्याच्या खात्यावर जमा केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यानी दिली या गळीत हंगामामध्ये ४ लाख ३१ हजार ४४६ मे.टन ऊसाचे गाळप होऊन १२.१० टक्के साखर उता-याने ५ लाख २२ हजार २८० क्विंटल पांढ - या साखर पोत्यांचे उत्पादन झाले. २०२०-२१ या हंगामात निव्वळ एफ.आर.पी. प्र.टन रु २७५९.३०  इतकी आहे. हंगामात गाळप झालेल्या संपुर्ण ऊसाची बिले तोडणी वहातूक दाराचीही बिले वेळेत व्यवस्थापनाने उत्पादकांचे बँक खात्यामध्ये वर्ग केलेली आहेत.तसेच या हंगामात  डिस्टीलरी प्रकल्पामधून ५२ लाख ९० हजार ब.लिटर रेक्टीफाईड स्पिरीटचे उत्पादन झाले आहे.पूढील  २०२१-२२ हंगामामध्ये इथेनॉल निर्मिती करणेचा व्यवस्थापनाचा मानस असून , त्या दृष्टीने डिस्टीलरीचे आधुनिकीकरण करणेचे काम सुरु आहे .त्यामुळे शेतकरीवर्गाने आपल्या ऊसाचे व वहानमालकानी आपल्या वहानांचे करार करण्यासाठी  संबंधित गट कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री खोराटे यांनी केले आहे.No comments:

Post a Comment