गावा-गावातून पोलिसांच्या गस्तमुळे चौका-चौकातून पळापळ, काय आहे कारण.......... - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2021

गावा-गावातून पोलिसांच्या गस्तमुळे चौका-चौकातून पळापळ, काय आहे कारण..........

संग्रहित छायाचित्र

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या राज्यभर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे. तथापि चंदगड तालुक्याच्या  पूर्वेकडील कर्यात भागातील अनेक गावात चौकाचौकात विनाकारण गप्पा मारत घोळक्या घोळक्याने ग्रामस्थ व तरुण निवांत थांबलेले होते. याची खबर मिळताच कोवाड पोलिसांनी गस्त फेरी काढून आज शनिवार दि. २४ रोजी सायंकाळी सात ते साडेआठ च्या दरम्यान चौकाचौकात  निवांत थांबलेल्या ग्रामस्थ व तरुणांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिल्यामुळे एकच तारांबळ उडाली.

       मुळातच अपुऱ्या पोलीस बळामुळे संचार बंदीचे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत की नाही हे पाहणे पोलीस यंत्रणेला शक्य नाही. तरीही आज सायंकाळी कोवाड पोलीस ठाण्याच्या वतीने दोन पोलिस शिपायांनी राजगोळी खुर्द, राजगोळी बुद्रुक, तळगुळी, कुदनूर, कालकुंद्री, कागणी, कोवाड अशी दुचाकीवरून अचानक गस्त केली. यावेळी त्यांनी गावा-गावातील चौकाचौकात गप्पांत रंगलेल्या अनेकांना पोलिसी लाठीचा प्रसाद दिला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गप्पात रंगलेले वाट मिळेल तिकडे पळू लागले. उद्यापासून दूध संस्थेत दूध घालतात घर गाठायचे! असे आजच्या अनुभवावरून अनेकांनी ठरवून टाकले आहे. अचानक मिळालेल्या लाठ्यांच्या प्रसादाची चर्चा मात्र कर्यात परिसरातील गावागावांत मात्र चवीने होताना दिसत होती.
No comments:

Post a Comment