चंदगड शहरातून युवक बेपत्ता, वडिलांची पोलिसात वर्दी - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2021

चंदगड शहरातून युवक बेपत्ता, वडिलांची पोलिसात वर्दी

अविनाश ज्ञानेश्वर बेले
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील आरोग्य विभागाचे ऑफिस येथे येवून घरी जातो असे सांगून गेलेला युवक घरी गेला नाही. 19/04/2021 रोजी सुमारे 17.00 वा. सुमारास आरोग्य विभागाचे ऑफिस चंदगड (ता. चंदगड) येथुन तो बेपत्ता आहे. अविनाश ज्ञानेश्वर बेले (वय वर्षे-२३, रा. सध्या रा. ब्रम्हदेवनगर चंदगड ता. चंदगड, मुळ रा. मोरवड पोस्ट खरवड, ता. कळमोनुरी जि. हिंगोली) मुलगा कोठेही मिळून न आल्याने वडील ज्ञानेश्वर बेले यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. 

        दि. 19/04/2021 रोजी सायंकाळी 17.00 वाचे सुमारास यातील वर्दीदार हे चंदगड येथील ऑफिस मध्ये असताना मुलगा अविनाश यास त्यांची चार चाकी गाडी घेवुन ऑफिस जवळ येणेस सांगितलेन. मुलगा अविनाश याने चार चाकी गाडी घेवुन येवुन गाडी आरोग्य विभागाच्या ऑफिस जवळ लावली. ऑफिस जवळ असलेली मोटार सायकल घेवुन घरी जातो असे सांगुन निघुन गेला. वडील ज्ञानेश्वर बेले हे घरी गेल्यानंतर मुलगा घरी न आल्याने याबाबात त्यांनी पत्नीकडे विचारणा केली. मात्र तो घरी न आल्याचे सांगण्यात आले. वाट पाहूनही मुलगा घरी न आल्याने त्याचे मित्र, नातेवाईक यांचेकडे शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. त्यामुळे वडीलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. नि. सो यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक श्री. शिंदे तपास करत आहेत. 

बेपत्ता युवकाचे वर्णन पुढील प्रमाणे - शिक्षण – एम.ए., अंगाने मध्यम, उंची अंदाजे 5 फुट 6 इंच, रंग-सावळा, केस काळे, नाक-सरळ, अंगात जांभळे रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात –चप्पल, भाषा मराठी हिंदी व इंग्रजी बोलतो.




No comments:

Post a Comment