ताम्रपर्णी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री रणजित देसाई यांची जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2021

ताम्रपर्णी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री रणजित देसाई यांची जयंती साजरी

 

ताम्रपर्णी प्रतिष्ठानच्यावतीने रणजित देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करताना दयानंद सलाम, कृष्णा बामणे आदी.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      कोवाड (ता. चंदगड) येथील तम्रपर्णी प्रतिष्ठानच्यावतीने ८ एप्रिल रोजी 'स्वामी'कार, पद्मश्री रणजीत देसाई यांची ९३वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले.  प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा बामणे यांनी केले. दयानंद सलाम, बाळु धामणेकर महाराज आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी ज्ञानेश्वर देवण, केशव कोकीतकर, संगीतकार देवेंद्र कांबळे (कालकुंद्री), दयानंद सरवणकर, नारायण दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.  महादेव पाटील यांनी  आभार मानले.

No comments:

Post a Comment