आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गोकुळच्या राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, कोठे केला शुभारंभ........ - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गोकुळच्या राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, कोठे केला शुभारंभ........

 

गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील सोबत सर्व उमेदवार

तेऊरवाडी  ता. २० /सी .एल. वृत्तसेवा 

        गोकुळचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील -चुयेकर यांच्या पुतळ्याला आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून गोकुळच्या राजश्री शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

          यावेळी या विरोधी आघाडीचे उमेदवार आबाजी उर्फ विश्वासराव पाटील, अरूण डोंगळे, शशिकांत पाटील - चुयेकर, बाबासाहेब चौगुले, अजित नरके, नविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेगे, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, रणजितसिंह पाटील, विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, महाबळेश्वर चौगुले, किसन चौगुले, अमरसिंह पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, सुस्मिता राजेश पाटील व अंजना रेडेकर हे उमेदवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment