संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले - विष्णू कार्वेकर, सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2021

संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले - विष्णू कार्वेकर, सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

विष्णू कार्वेकर यांचा सत्कार करताना वाचनालयाचे अध्यक्ष द. य. कांबळे, सूर्याजी ओऊळकर, शिवाजी पाटील आदी

चंदगड / प्रतिनिधी

            "वाचनालयातून प्रेरणा घेऊन आयुष्याची वाटचाल केली. आयुष्यभर संघर्ष करण्याचे बळ मला ग्रंथातून मिळाले. विद्यार्थ्यांना समाधान वाटेल असे अध्यापन केले. कोणतीही सेवा करत असताना आपल्या जवळ सामर्थ्य आणि कौशल्ये असणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन मुख्याध्यापक विष्णू कार्वेकर यांनी सत्कार प्रसंगी केले.  सेवानिवृत्त झाल्याबद्दल श्री कार्वेकर आणि सौ. वैशाली कार्वेकर  यांचा सपत्नीक तसेच आजरा तहसिल कार्यालयात महसूल सहाय्यक या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल सुरेश कांबळे यांचा मौजे कारवे ता. चंदगड येथील सरस्वती वाचनालयाच्यावतीने  सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी सरपंच जोतिबा आपके होते.  

       प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश दुकळे यांनी केले. याप्रसंगी द .य. कांबळे, अविनाश कांबळे, राजू चिंचणगी, सुरेश कांबळे यांनी मनोगते मांडली. आभार सूर्याजी ओऊळकर यांनी मानले.

          कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास नारायण ओऊळकर, शिवाजी पाटील, नारायण पाटील, महादेव दुकळे, सौ रेणुका कांबळे, सौ. शीतल ओऊळकर, सौ. प्राजक्ता दुकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल जॉनी फर्नांडीस,सौ. हेमिल फर्नांडीस व सौ. चंदा कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment