डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंदगड येथे कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2021

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चंदगड येथे कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक


चंदगड / प्रतिनिधी

        महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  चंदगड तालुका तसेच गाव पातळीवर मोठया उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरी केली जाते. परंतु जागतिक कोरोना : १ ९ संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या वेळोवेळी निघणाऱ्या निर्देशाला आधीन राहून काटकोरपणे शासनाच्या नियमांचे पालन करून यावर्षीची १३० वी जयंती साजरी करणेचे आहे. याबाबत विचार विनिमय करणेसाठी शुक्रवार ०९ / ०४ / २०२१ रोजी सकाळी १० वाजता चंदगड येथील तालुका दलित समाज सुधारणा मंडळ या ठिकाणी सर्व सामाजिक, पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी व सामाजिक कायकर्ते यांनी हजर रहावे असे आवाहन चंदगड तालुका दलित मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते आयु. गणपती रामू कांबळे (नांदवडे), आयु. श्रीकांत अर्जुन कांबळे चंदगड यांनी केले आहे. सदरची सभा शासन निर्देशाधीन घेणेत येणार असून सभेला येताना मास्क व हँड सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सभेच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणेचे आहे.



No comments:

Post a Comment