अन् मुख्याध्यापकांनी पकडला सुपाखाली लपलेला अस्सल नाग - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2021

अन् मुख्याध्यापकांनी पकडला सुपाखाली लपलेला अस्सल नाग

घरामध्ये लपून बसलेल्या नाग सर्पाला पकडून जंगलाकडे नेताना मुख्याध्यापक गुलाब पाटील.

तेऊरवाडी -सी .एल. वृतसेवा
नुसता साप म्हटला तरी सर्वांची पाचावर धारण बसते .पण घरातील संयपाक खोलीत चक्क सुपाखाली लपलेल्या नागाला श्री सातेरी विद्यालय कोलिक चे मुख्याध्यापक गुलाब पाटील यानी क्षणाचाही विलंब न करता या नागाला पकडून खुरक्षित जंगलात सोडले .सर्पमित्र असलेल्या  मुख्याध्यापकांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
    अधिक माहिती अशी , कोलिक येथें ढोक मुरकर यांच्या स्वयंपाक घरात अस्सल नाग साप शिरला असल्याची माहिती कोलिक चे सरपंच संभाजी गावडे व गोपाळ गावडे याने गुलाब पाटील यांना दिली . यानंतर मुख्याध्यापक गुलाब पाटील यानी सर्व शिक्षकांच्या बरोबरच बोकमुरकर यांच्या घराकडे धाव घेतली. घरातील स्वयंपाक खोली मध्ये पाहणी केली असता हा विषारी नाग  स्वयंपाक खोलित असलेल्या सुपाच्याली लपल्याचे निदर्शनास आले .तात्काळ गुलाब पाटील यानी या नाग सर्पाला पकडले व बाहेर अंगणामध्ये आणल्या यानंतर सुरक्षित रित्या शेजारी असलेल्या जंगलामध्ये  सोडून दिले. सुदैवाने यावेळी स्वयंपाक खोलीत कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला . चंदगड तालुक्यात प्रचंड प्रमाणात विषारी सापांचे वास्तव्य आहे. असे अनेक विषारी सर्प आपल्या भक्ष्याच्या शोधात अनेक वेळा घरामध्ये प्रवेश करतात. पण गुलाब पाटील यांच्यासारखे मुख्याध्यापक जे सर्पमित्र म्हणून काम करतात अशा घरांमध्ये शिरलेल्या सर्णना पकडून ते सुरक्षित रित्या जंगलामध्ये सोडून देतात. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळतो मुख्याध्यापक श्री पाटील यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment