मन सुन्न करणारी घटना : आई - वडील व मुलाचा कोरोणाने मृत्यू , एकाच घरातील तिघांचा मृत्यू, वाचा कोठे घडली ही घटना.......... - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2021

मन सुन्न करणारी घटना : आई - वडील व मुलाचा कोरोणाने मृत्यू , एकाच घरातील तिघांचा मृत्यू, वाचा कोठे घडली ही घटना..........

एस. के. पाटील / तेऊरवाडी प्रतिनिधी (सी. एल. वृत्तसेवा)

        महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्हयातही कोरोना थैमान घालत आहे. सर्वत्र रूग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येकाच्या मनात धडकी भरत आहे. रोज रुग्णाच्या मृत्युचे आकडे वाढतच आहेत. अशातच गडहिंग्लज तालुक्यातील दुगूनवाडी येथे तर कोरोणाच्या उद्रेकाचा जबरदस्त फटका एका कुंटुंबाला बसला. मन सुन्न करणाऱ्या या ह्रदयद्रावक घटनेत आई-वडील व मुलाचा मृत्यू केवळ एका आठवड्यात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोणाचा हा महाप्रलय कीती भयंकर आहे याची प्रचिती या घटनेने येते. 

        दुगुनवाडी येथील निवृत्त जवान मारूती भिमा पाटील यांची पत्नी सुमन यांचे कोरोनाने शनिवार दि. १0 एप्रिल रोजी निधन झाले. सुमनच्या निधनानंतर जवान मारूती पाटील व मुलगा राजेंद्र यांनाही कोरोणाची लागण झाल्याचे निदान झाले. यानंतर त्या दोघांनाही गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार चालू असतानाच निवृत्त जवान मारूती यांचे शनिवार दि. १७ रोजी निधन झाले. त्यांच्यावर गडहिंग्लज येथेच प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. आई-वडीलांच्या मृत्यूनंतर मुलगा प्रकाश यांचीही तब्बेत बिघडल्याने गडहिंग्लज मधून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार चालू असतानाच प्रकाश याचाही कोल्हापूला रविवार दि. १८ रोजी मृत्यू झाला. प्रकाशवरही कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. आठवड्यातच आई-वडिल व मूलाचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण तालूका हादरला. या घटनेने कोरोणाचे रौद्र रूप पहावयास मिळाले. योगायोग असा की जवान मारूती यांचा व पत्नी सुमन यांचा मृत्यू शनिवारीच झाला.

     *कोरोणाने  डॅडीचे सुखी कुटूंब उध्वस्थ* 

       कुटुंबातील कर्ता पुरूष असलेले  मारूती पाटील हे भारतीय सैन्य दलालून निवृत्त झाले होते. कुटुंबासह सर्वजन त्याना डॅडी म्हणूनच हाक मारायचे. त्यांना तिन मुलगेच होते. त्यापैकी रामचा पाच वर्षापूर्वी मृत्यु झाला होता. मयत राजेंद्र यांचे गडहिंग्लज हरळी साखर कारखान्यासमोर वाहन सर्विसींग सेंटर होते. तर शाम शिनोळी येथे खाजगी कंपनीत नोकरी करत आहे. शेती, नोकरी व व्यवसाय करून अत्यंत सुखी जीवन जगणारे डॅडिंचे  कुटुंब केवळ कोरोणाने उध्वस्त झाले.

        त्यामुळे फाजील आत्मविश्वास बाळगून कोरोनाच्या शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांना भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठीच पुर्ण खबरदारी घेवूनच घराबाहेर पडा. जीवन अनमोल आहे. सुरक्षा हेच बचावाचे उत्तम साधन आहे. 



No comments:

Post a Comment