कालकुंद्री येथील वाचनालयास विविध स्तरावरून देणग्या - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

कालकुंद्री येथील वाचनालयास विविध स्तरावरून देणग्या

 

कृष्णा पाटील यांच्या कुटुंबीयांकडून देणगी रक्कम स्वीकारताना वाचनालयाचे पदाधिकारी.

 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक कृष्णा कामाना पाटील यांचा ९० वाढदिवस नुकताच संपन्न झाला. यानिमित्त नको म्हणत असतानाही भेट म्हणून ३२११ रुपये बंद पाकिटातून जमा झाले. ही सर्व रक्कम त्यांनी नुकतीच गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास देणगी दिली तर साहित्यिक रणजित देसाई लिखित नाटक, कादंबरी, कथासंग्रह आदी ४२ पुस्तकांचा संच माजी सरपंच सुरेश नाईक यांनी वाचनालयास प्रदान केला. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सरपंच छाया जोशी होत्या.

          स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. व्ही आर पाटील यांनी केले. शिवप्रतिमेचे पूजन उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. कृष्णा पाटील व सुरेश नाईक यांच्यासह वर्षभर विविध वर्तमानपत्रे देणगी स्वरूपात देणारे प्रताप आनंदराव पाटील, फारूख कलकुंद्रीकर (कुदनुर), संदीप बाजीराव पाटील, तुळशीदास जोशी, यांचा सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल तर गावातील मॅराथॉन धावपटू प्रथम पांडुरंग पाटील व सुमित बंडू पाटील यांचा राज्य पातळीवरील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र पाटील, झेवियर क्रूज, शिवाजी खवणेवाडकर, शिवाजी पाटील, वंदना पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन पी. एस. कडोलकर केले. आभार विलास शेटजी यांनी मानले.

No comments:

Post a Comment