कोवाड मध्ये विनाकारण, विना मास्क फिरणाऱ्यावर प्रशासनाकडून कारवाई , १५ दुचाकी जप्त तर ४२५० रुपयांचा दंड वसूल - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

कोवाड मध्ये विनाकारण, विना मास्क फिरणाऱ्यावर प्रशासनाकडून कारवाई , १५ दुचाकी जप्त तर ४२५० रुपयांचा दंड वसूल

कोवाड बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्यांना दंडाची कारवाई करताना पोलिस.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) मध्ये संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासन व पोलीसांच्याकडून आज संयुक्त रित्या कारवाई करण्यात आली. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत पोलिसांकडून १५ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून विनाकारण,विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ४२५० रुपयांचा  दंड वसूल करण्यात आला.

      कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्वानीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉक डाऊन सुरू आहे. चंदगड तालुक्यात दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत आजवर  १२६४  रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत.तरीही अनेक ठिकाणी अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.

      त्यामुळे आज कोवाड मध्ये अचानक सकाळच्या सत्रात स्थानिक प्रशासनाकडून अशा अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला.त्यानंतर दुपारी भर उन्हात गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर,डीवायएसपी गणेश इंगळे,तहसीलदार विनोद रणावरे,गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पाणी विभागाचे अभियंता सावळगी यांच्याकडून स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करण्यात आली. 

       यावेळी या मोहिमेत चंदगड चे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार,अंकुश कारंडे,पोलीस नाईक सुरेश भदरगे,पोलीस नाईक प्रकाश पुजारी,पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे,अमर सायेकर, होमगार्ड श्रीनाथ मेगुलकर,प्रमोद भास्कल यांनी सहभागी होते.यावेळी विनाकारण,विनामास्क फिरणाऱ्या 15 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असून नागरिकांकडून 4250 रु चा दंड वसूल करण्यात आला आहे.यावेळी प्रांताधिकारी पांगारकर यांनी स्थानिक प्रशासनाला दक्ष राहण्याबाबत सूचना केल्या.

       दरम्यान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्न चौगुले यांचेकडून कोविड प्रतिबंधित लसीकरणं, कोविड रुग्ण, गावातील कोरोना सर्व्हे बरोबरच इतर बाबींचा  सविस्तर आढावा घेतला. यावेळी कोवाडचे सर्कल शरद मगदूम, तलाठी दीपक कांबळे, अमर सांगळूरकर, अक्षय कोळी, ग्रामसेवक जी. एल. पाटील, कोवाडच्या सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलीक जाधव, रामचंद्र व्हन्याळकर, चंद्रकांत सुतार सहित सर्व सदस्य उपस्थित होते. या कारवाईची धास्ती सर्वच वाहन चालकानी घेतली असली तरी ही कारवाई वारंवार होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment