चंदगड तालुक्याच्या कोरोनाचा आलेख वाढताच, आज दिवसभरात २७ रुग्णांची भर, वाचा कोणत्या गावात........... - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2021

चंदगड तालुक्याच्या कोरोनाचा आलेख वाढताच, आज दिवसभरात २७ रुग्णांची भर, वाचा कोणत्या गावात...........

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

राज्यासह जिल्ह्यात व तालुक्यात संचारबंदी असली तरी कोरोनाचा आलेख हा दिवसेनदिवस वाढतच आहे. शेजारच्या आजरा व गडहिंग्लज तालुक्यातही रोज रुग्ण सापडत आहेत. संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प असतानाही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. लोक घरीत असूनही चंदगड तालुक्यातील कोरोनाचा आकडा रोज वाढताच आहे. आज दिवसभरात चंदगड तालुक्यात २७ नवे रुग्ण सापडले आहेत. १ एप्रिलपासून आतापर्यंत २१६ रुग्ण पॉझिटीव्ह झाले आहेत. त्यापैकी ४७ जणांनी कोरोनावर मात केलेले असून १६४ रुग्ण उपचार घेत आहेत. 

      लोकांच्यामध्ये कोरोनाची भिती दिवसेनदिवस वाढत आहे. तरीही काही लोक केवळ पोलिसांच्या व दंडाच्या भितीने कोरोनाचे नियम पाळत आहेत. काही लोक मात्र आपल्यामुळे इतरांना त्रास होवू नये. यासाठी काटेकोरपणे मास्क घालणे, दोन व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टी पाळत असल्याने थोड्याफार प्रमाणात कोरोनाला आळा बसला आहे. कोरोना विषयी लोकांच्या मनात जी भिती आहे. ती दुर होण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. 

संचारबंदीच्या काळात सकाळी सात ते अकरा या दरम्यान भाजीपाला व किराणी दुकाने उघडण्याची मुभा असली तरी नागरीक भाजी खरेदी करताना व या काळात बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी करतानाचे चित्र आहे. या गोष्टी टाळण्याची गरज आहे. सरकार कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करत असले तरी नागरीकांनी त्याला साथ न दिल्यास कोरोना आणखी वाढण्याची शक्यता आहे. जेवढ्या जलदगतीने कोरोनाची लाट आलेली आहे. या लाटेला रोखण्यासाठी नागरीकांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. शासन हे लोकांच्या भल्यासाठी नियम लावत असले तरी काही लोकांच्या बेफीकीरीमुळे असंख्य लोक अडचणीत येत आहेत. त्यामुळे या गोष्टीचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. 


           आज दि. २७-०४-२०२१ चंदगड तालुका कोरोना अपडेट

        आज दिवसभरात चंदगड तालुक्यात एकूण २७ जण पॉझिटीव्ह

चंदगड – १

पिळणी -५

किणी – ५

मांडेदुर्ग – २

सुंडी – २

नागनवाडी – २

फाटकवाडी – २

जांबरे – १

पुंद्रा – १

पाटणे – १

आडुरे – १

पार्ले – १

ढोलगरवाडी – १

बिजूर – १

गुळब – १


१ एप्रिल 2021 पासून आजपर्यंतची आकडेवारी 

एकूण पॉझिटीव्ह - २१६

कोरोनावर मात केलेले -४७

सद्या उपचार घेत असलेले -१६४

मयत - ५

घरी अलगीकरणात असलेले - ९०

कंटेनमेंट झोन -४७


* विशेष सुचना – कोरोनाचा आकडेवारी सांगताना आपण सतर्क रहावे. सद्यस्थितीला तालुक्यात काय परिस्थिती आहे. याचा आपण सारासार विचार करुन घराबाहेर जाताना खबरदारी घ्यावी. या उद्देशाने हि आकडेवारी सांगितली जाते. यातून आपल्या मनात भिती उत्पन्न करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. *




No comments:

Post a Comment