कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सोमवारचा कानूर खुर्द आठवडा बाजार बंद, कानुर कोरोना दक्षता समितीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सोमवारचा कानूर खुर्द आठवडा बाजार बंद, कानुर कोरोना दक्षता समितीचा निर्णय

 


कानूर / सी. एल वृत्तसेवा

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी कानूर खुर्द (ता. चंदगड) येथील उद्या सोमवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत कानूर कोरोना दक्षता समिती कानूर खुर्द यांनी घेतल्याची माहीती सरपंच निवृत्ती पाटील यांनी दिली.

कानूर खुर्द येथे दर सोमवारी आठवडा बाजार भरत  असून या आठवडा बाजारासाठी कानूर परिसरातील 25 गावांसह वाड्या वस्त्यावरील ग्रामस्थ त्याच बरोबर आंबोली चौकुळ ही सावंत वाडी तालुक्यातील गावातील ग्रामस्थ आठवडा बाजारासाठी येतात त्याच बरोबर आजरा तालुक्यांतील घाटकरवाडी ,धनगरमोळा ची ग्रामस्थ बाजारनिम्मंत कानूर खुर्द ला येतात

 सध्या पुण्या-मुबई वरून काही ग्रामस्थ प्रवास करून आले आहेत त्याशीवाय तालुक्यात कोरोनाचा ऍक्टिव्ह रुग्ण ही मोठ्या प्रमाणात आहेत कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणू न आठवडा बंदचा निर्णय  ग्रामस्थ व कोरोना समिती च्या बैठकीत घेण्यासाठी आला असून परिसरातील ग्रामस्थांनी व व्यापऱ्यांनी सहकार्य करावे अशे आव्हान सरपंच निवृत्ती पाटिल यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment