चंदगड तालुक्यात लसीकरणचा सूरवात, सात हजार लस उपलब्ध - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2021

चंदगड तालुक्यात लसीकरणचा सूरवात, सात हजार लस उपलब्ध

  


चंदगड/प्रतिनिधी :--( नंदकुमार ढेरे)

 "कोव्हीशिल्ड "लस उपलब्ध झाल्याने चंदगड  तालुक्यात आरोग्य विभागाने   रविवारी ही लसीकरण केले.  लस संपल्यामुळे शुक्रवारपासून लसीकरण बंद ठेवण्यात आली होती.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १ एप्रिलपासून , ४५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना सरसकट लस देण्याची मोहिम उघडण्यात आली . त्यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यात आले . त्यातच सुरूवातीच्या काळात लस घेण्याकडे टाळाटाळ करणाऱ्या लोकांनी कोरोना संसर्गाची वाढती आकडेवारी पाहून लसीकरण करून घेण्यास प्राधान्य दिले . त्यामुळे लोकांचा प्रतिसाद वाढला . चंदगड तालुक्यात ग्रामीण रूग्णालयासह कानूर , हेरे , तुडये , माणगाव , कोवाड , अडकूर या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आणि अन्य पाच आरोग्य उपकेंद्रातून लसिकरण सुरू होते . तथापि लोकांचा प्रतिसाद असूनही शासनाकडून लसीचा पुरवठा न झाल्याने शुक्रवार पासून १०० टक्के लसीकरण केंद्रे बंद झाली आहेत. रविवार अखेर ३८२००नागरिकांचे लसीकरण केलेले आहे .शनिवारीच जिल्हा प्रशासनाकडून कोव्हिशिल्ड उपलब्ध झाल्याने  कामकाज पूर्ववत सूरू झाले.काल चंदगड तालुक्यासाठी सात हजार लस उपलब्ध झाल्याची माहिती  तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ . आर . के . खोत यांनी दिली.



No comments:

Post a Comment