माणगाव येथे बाधंकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2021

माणगाव येथे बाधंकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

माणगाव (ता. चंदगड) येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप करतांना कामगार अधिकारी एकनाथ गुरव  ,अध्यक्ष कलाप्पा निवगीर, उपाध्यक्ष बाबू चौगले आदी 

चंदगड / प्रतिनिधी

         माणगाव (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन यांच्या वतीने नोंदणीकृत केलेल्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बाधंकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या कडून देण्यात येणाऱ्या योजना पैकी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या  सुरक्षासंच व अत्यावश्यक साहीत्याचे वाटप कामगार अधिकारी एकनाथ गुरव, अध्यक्ष कलाप्पा निवगीरे व उपाध्यक्ष बाबू चौगले यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. 

      यावेळी अध्यक्ष कलाप्पा निवगीरे चंदगड तालुक्यातील बांधकाम कामगारानी चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन कडे नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार,परसू नरी,शिवाजी तरवाळ, नारायण वरगावकर,सुरेश चिचंनगी,सुनील पिटूक,लक्ष्मण नाईक, राजू तरवाळ, मारूती नाईक, मारूती चिचंनगी,तुकाराम नरी,उपस्थित होते..

No comments:

Post a Comment