चंदगडला अवकाळी पावसाचा दणका, झाड पडून वाहतूक काही काळ ठप्प - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2021

चंदगडला अवकाळी पावसाचा दणका, झाड पडून वाहतूक काही काळ ठप्प

चंदगड नागणवाडी मार्गावर पावसामुळे पडलेले झाड.


चंदगड / प्रतिनिधी

 चंदगड शहरासह शिरगांव, हिंडगाव,फाटकवाडी, आसगाव, सूळये, नागवे,   परिसरात आज अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बेळगाव-वेगुर्ला मार्गावरील र भा माडखोलकर महाविद्यालयासमोर  जुनाट वृक्ष कोसळून पडल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली होती.आज दुपारी एकच्या दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उष्मा जाणवत होता. दुपारी दोनच्या दरम्यान सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. पाऊस एवढ्या जोराचा होती की  पावसाने शिवारात पाणी साठले होते. त्यामुळे ऊसाला पाणी पाजवण्यासाठी शेतकऱ्यांना चार दिवस विश्रांती मिळाली आहे. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील मका भुईसपाट झाला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे बहुतःश गावातील गटारे तुंबल्याने गावात दलदल झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. हा पाऊस ऊस, काजू व भुईमूगाला लाभदायक ठरला असून उन्हाळी भात पिकाला नुकसानीचा ठरला आहे. 




No comments:

Post a Comment