तिलारी येथे शेकरूचा शाॅक लागून मृत्यू, कधी घडली घटना......... - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2021

तिलारी येथे शेकरूचा शाॅक लागून मृत्यू, कधी घडली घटना.........

शेकरु

चंदगड / प्रतिनिधी  

        तिलारीनगर (ता. चंदगड) येथील पॉवर हाऊस नजिक विजेचा जोराचा धक्का लागून शेकरू (मोठी खारूताई) पायासोबत अंतर्गत अवयव निकामी झालेने मृत्यु झाला.

        पावर हाऊस जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या  विदयुत वाहीनी शेजारील झाडावर बागडणा-या शेकरुच्या जोडीतील मादी शेकरु शनिवार दि. १७ रोजी उच्च विदयुत दाबाच्या वाहिनीवरून खाली जमिनीवर पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याबाबतची माहिती प्राणी प्रेमी अभिजीत वाघमोडे यांनी वनविभागाला दिली वनरक्षक गिरीष वळवी, व वनमजुर मोहन तुपारे यांनी जखमी शेकरुस पाटणे येथे आणले. पशुवैधकीय अधिकारी डाॅ. ए. एन. कोळी यांनी उपचार केल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. तसेच ते खाऊ पिऊ व चालु लागले होते. सोमवार दि. १९ रोजी त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुर येथे घेऊन जाणेचे नियोजन केले होते. पण सकाळीच शेकरुने वनअधिका-यांसमोर आपले प्राण सोडले. तुर्केवाडी येथील पशुवैधकीय अधिकारी डाॅ. ए. टी. शिगवण यांनी शवविच्छेदन केल्यानंतर शेकरुचे अंतविधी करुन दहन-दफन केले. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक जी. पी. वळवी, जी. एस. बोगरे, वनमजुर मोहन तुपारे, तुकाराम गुरव व चंद्रकांत बांदेकर, इतरेजा नाईक यांनी सहकार्य केले. जखमी शेकरु वाचविण्यासाठी वनविभागासोबत अभिजीत वाघमोडे व त्यांच्या सहकार्यांनी खुप प्रयत्न केले. मात्र विजेचा धक्का जोराचा लागलेने शेकरुचे पाया सोबत अंतर्गत अवयव निकामी झालेने त्याचा मृत्यु झाला.No comments:

Post a Comment