संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कोवाडमध्ये प्रशासनाची व्यापाऱ्यांसोबत बैठक, व्यावसायिकांसाठी काय आहे निमयावली........ - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2021

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कोवाडमध्ये प्रशासनाची व्यापाऱ्यांसोबत बैठक, व्यावसायिकांसाठी काय आहे निमयावली........

कोवाडमध्ये संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त आहे. 

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज सोमवार 19 एप्रिल २०21 रोजी ग्रामपंचायत  कोवाड (ता. चंदगड) येथे प्रशासनासोबत बैठक पार पडली.

       प्रशासनाने व्यवसायीकांसाठी काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे.

        1) सर्व व्यापार्यांनी व दुकानातील कर्मचाऱ्यांनी  कोवीड प्रतिबंधक लस दोन दिवसात घ्यावी...(ज्या व्यापार्यांचे वय 45 पेक्षा कमी आहे त्यांनी खासगी रूग्णालयात लस घ्यावी. लस घेतलेले प्रमाणपत्र नसेल तर दुकानावर  दंडात्मक कारवाई करणेत येईल.

      2)शासनाने याआगोदर ज्या अत्यावश्यक सेवा दुकानांना परवानगी दिलेली आहे तेवढीच दुकाने आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील. सदर दुकानदारांनी ..मास्क..सँनिटायजर..सोशल डिस्टनसींग साठी दुकानासमोर बँरीकेट्स या सर्व गोष्टी तंतोतंत पाळाव्यात.

         3)गुरूवारचा आठवडी बाजार बंद राहील.

        4) मास्क न वापरणार्या व्यक्तींना पाचशे रूपये दंड आकारण्यात येईल.

   5)विनाकारन व विनामास्क विनालायसन्स कोवाड बाजारपेठेत फिरणार्यांच्या गाड्या जप्त करण्यात येतील.

     अशा प्रकारच्या सक्त सुचना प्रसासनाने दिलेल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी दखल घ्यावी.

        या बैठकीला  जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, मंडल अधीकारी  श्री. मगदुम, तलाठी श्री. कांबळे, कोवाड पीएचसी डॉ. प्रसन्ना चौगुले, ग्रामसेवक जी. एल. पाटील, पोलीस कॉ. शिंदे, सरपंच अनिता भोगण, डे. सरपंच पुंडलीक जाधव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

        आजपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. यापुढेही सर्वांनी नियमांचे पालन करून आपली कोवाड बाजारपेठ व कोवाड गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment