डीजे, बेंजो बंद केल्याच्या कारणावरून पोलीस पाटलास मारहाण - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2021

डीजे, बेंजो बंद केल्याच्या कारणावरून पोलीस पाटलास मारहाण

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

 लगीन घरात सुरू असलेले डीजे गाण्याचे बॉक्स व बॅन्जो बंद करण्यास लावले म्हणून गाव कामगार पोलीस पाटलास तिघांनी मारहाण करून घरातील साहित्याची मोडतोड केली. ही घटना सोमवार २६ रोजी रात्री उशिरा कळसगादे, ता चंदगड येथे घडली.

घटनेची थोडक्यात हकीकत अशी, सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव कमिट्या व शासन यंत्रणा कार्यरत आहे. तथापि कळसगादे येथे लगीन घरात बॅंजो, डीजे सुरू होता. तो थांबवा म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटील सदानंद विठू सुतार रा. कळसगादे यांना तू कोण विचारणार; असे धमकावून गावातील मनोहर भवाना दळवी, आनंद दत्तू दळवी रामा भिकाजी दळवी यांनी शिवीगाळ केली. ही घटना रात्री साडेअकरा वाजता विठोबा मोतीराम गावडे यांचे दारात घडली. त्यानंतर रात्री साडे बाराच्या सुमारास वरील तिघांनी सुतार यांच्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून उठवले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांची काकू मध्ये पडली असता तिलाही ढकलून दिले. व घरातील साहित्याची मोडतोड केली. याची फिर्याद स्वतः सदानंद सुतार यांनी चंदगड पोलिसात दिली असून चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील दक्षता कमिटी वर्तुळात खळबळ उडाली आहे.


No comments:

Post a Comment