साईड पट्ट्यांअभावी रस्ता खराब होण्याचा धोका, कागणी- कालकुंद्री नवीन रस्त्याची स्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2021

साईड पट्ट्यांअभावी रस्ता खराब होण्याचा धोका, कागणी- कालकुंद्री नवीन रस्त्याची स्थिती

कागणी ते कालकुंद्री याच नवीन डांबरी रस्त्याला साईड पट्ट्यांची गरज आहे

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला कालकुंद्री ते कागणी रस्ता साईड पट्ट्यां अभावी खराब होत आहे. या रस्त्याच्या साईट पट्ट्या तात्काळ कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ, प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

     कागणी- कालकुंद्री डांबरीकरण आभावी रखडलेल्या रस्ता प्रश्नी बांधकाम विभागाच्या चंदगड कार्यालयावर १२ एप्रिल रोजी बॅटरी मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांनी दिला होता. खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने घाईगडबडीने पण दर्जेदार असा ९०० मीटर लांबीचा रस्ता दहा-बारा दिवसापूर्वी पूर्ण केला आहे. पहिला ठेकेदार पळून? गेल्यानंतर क्षत्रिय कन्ट्रक्शनचे गौरव सावंत यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सद्यस्थितीत डांबरी रस्ता अरुंद व उंच असल्याने दोन चार चाकी वाहने समोरासमोर आल्यास बाजू काढताना वाहन खाली घ्यावे लागते. त्यामुळे रस्ता खराब होत आहे चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि जास्त वर्दळीचा आहे. तो सुस्थितीत राहण्यासाठी साईड पट्ट्यांची नितांत गरज आहे. तरी बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन दगडी खडी व माती किंवा चिखल न होणारे खडक टाकून साईड पट्ट्या तयार कराव्यात अशी मागणी आंदोलक ग्रामस्थांसह प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.

No comments:

Post a Comment