आयपीएल २०२१ ला ९ एप्रिल २०२१ पासून प्रारंभ, प्रेक्षणाविना होणार सामने, मुंबई इंडियन्स संघ किती मॅचेस खेळणार? - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2021

आयपीएल २०२१ ला ९ एप्रिल २०२१ पासून प्रारंभ, प्रेक्षणाविना होणार सामने, मुंबई इंडियन्स संघ किती मॅचेस खेळणार?

                      


आयपील स्पर्धा

      आयपील स्पर्धा म्हणजे क्रिकेट प्रेमीसाठी एक पर्वणीच असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हि स्पर्धा होणार की नाही, याबाबत मतमतातंरे होती. मात्र 9 एप्रिल पासून इंडियन प्रिमिअर लिगच्या १४ व्या हंगामाला प्रारंभ होत आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपीटल्स, सनराईझर्स हैद्राबाद, राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब हे संघ सहभागी झाले आहेत. यावर्षी ही स्पर्धा भारतात होणार आहे. 


          मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्या प्रारंभीचा सामना रंगेल. मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलोर या ठिकाणी हे सामने रंगतील. 9 एप्रिल २०२१ रोजी रॉयल चॅलेजर बेंलगोर व मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना सायंकाळी ७.३० वाजता चेन्नई येथे होणार आहे. ५६ मॅचेसपैकी बेंगलोर चेन्नई, मुंबई व कोलकाता येथे प्रत्येकी १० तर दिल्ली व अहमदाबाद येथे प्रत्येकी ८ मॅचेस खेळवल्या जातील. ११ दिवस दुपारी ३.३० व सायंकाळी ७.३० वाजता डबल सामने खेळवले जातील. स्पर्धेमध्ये एकूण ६० मॅचेस होतील. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये प्लेऑफ व फायनल रंगणार आहे. ९ एप्रिल २०२१ रोजी स्पर्धा सुरु होणार असून ३० मे २०२१ रोजी फायनलने स्पर्धेची सांगता होणार आहे. सद्याची कोरोनाची स्थिती पाहता सुरवातीचे सामने हे प्रेक्षकाविना खेळवले जातील. त्यानंतर परिस्थिती सुधारल्यास पुढील सामन्याबाबत त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येईल. 

                  IPL 2021 मधील मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक
               

                       ९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई
१३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई
                       १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई
२० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई
                       २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई
२९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली
                       १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली
४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली
                       ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली
१० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू
                      १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू
१६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू
                      २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता
२३ मे- विरुद्ध DC- कोलकाता

 
No comments:

Post a Comment