उचगावच्या गणेश दूध केंद्राकडून दरकपात नाही, अन्य काही केंद्राकडून गाय दुधाला ४ रू. तर म्हैस दुधाला १ रू. कपात - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2021

उचगावच्या गणेश दूध केंद्राकडून दरकपात नाही, अन्य काही केंद्राकडून गाय दुधाला ४ रू. तर म्हैस दुधाला १ रू. कपात

 

प्रवीण देसाई

कागणी : एस. एल. तारिहाळकर / सी. एल. वृत्तसेवा

 सीमाभागातील विविध दूध संकलन केंद्राकडून कोरोनाचे निमित्त पुढे करून गाय दुधाला प्रती लिटर ४ रुपये तसेच म्हैस दुधाला १ रुपये दर कमी केले, मात्र उचगाव फाटा (ता. बेळगाव) येथील श्री गणेश दूध संकलन केंद्राचे  चेअरमन प्रवीण देसाई व मॅनेजर सुधाकर करटे यांनी कोरोना काळातही

 दर कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दर कमी केलेल्या केंद्रांना चंदगड, बेळगाव तालुक्यातून सुमारे दिवसाकाठी १५ हजार लिटर गाय व म्हैस दूध पुरवठा करण्यात येतो. 

याबाबत प्रवीण देसाई यांनी दर कपात न करून आदर्श निर्माण केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या दूध केंद्राचा अन्य केंद्रानी आदर्श घ्यावा, असे मत दूध उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

याबाबत गणेश दूध संकलन केंद्राचे चेअरमन प्रवीण देसाई, संचालक किरण देसाई,  मॅनेजर सुधाकर करटे यांनी आपली भूमिका सांगितली. 

प्रस्तुत प्रतिनिधीने सिमाभागात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. यात अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली. 

गत काही वर्षापासून  पशुखाध्याच्या व चाऱ्याच्या महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सोसावा लागत आहे. त्यातच सिमाभागातील काही संकलन केंद्रानी दि. २५ एप्रिल पासून दर कमी केल्याने दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांतून संतप्त भावना व्यक्त होत आहे.

  सध्या अन्य दूध केंद्राच्या तुलनेत गणेश दूध केंद्राला दूध पुरवठा करणार्‍या शेतकऱ्याना कोरोना काळात म्हैस दुधाला २ रुपये जादा दर तर गाय दुधाला ४ रुपये जादा दर देन्यात येत आहे. तसेच सहा महिन्यातून एकदा म्हैस दुधाला २ रुपये फरक बिल व गाय दुधाला १ रुपये फरक बिल, असे शेतकऱ्यांना देत आहेत. कोरीना काळातही ही सुविधा गणेश केंद्राकडून सुरू राहणार आहे.


विक्री दरात कपात नसताना खरेदी दरात कपात का ? असा सवाल उपलब्ध केला जात आहे. सुमारे 15 हजार लिटर दूध संकलन होणाऱ्या दुधाला दर कपात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान बंद करून दूध दर जैसे थे ठेवावा, अशी मागणी बेळगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांकडून होत आहे.


प्रतिक्रिया

कोरोना काळात पुरवठा होणाऱ्या दूध पुरवठा धारकांच्या दुधाला कोणतीही दर कपात करणार नाही. या उलट आम्ही दर सहा महिन्याला फरक बिल देऊन शेतकऱ्यांना न्याय देत आहोत.

प्रवीण देसाई, चेअरमन, गणेश दूध केंद्र, उचगाव.


प्रतिक्रिया

पशुखाद्याचे दर गेल्या  दिवसात 100 किलो बॅगमागे 80 रुपये वाढ झाली आहे. तसेच दोन वर्षात खाद्याच्या महागाईने दूध उत्पादकाना मोठा तोटा होत आहे. म्हणून आम्ही दरात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 सुधाकर करटे, 

मॅनेजर, गणेश दूध.





No comments:

Post a Comment