IPL ची स्पर्धा अचानक स्थगित बीसीसीआयचा निर्णय, वाचा काय आहे कारण..... - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2021

IPL ची स्पर्धा अचानक स्थगित बीसीसीआयचा निर्णय, वाचा काय आहे कारण.....

मुंबई 

क्रिकेटप्रेमीसाठी पर्वणी असलेली आयपीएल स्पर्धा सद्या अटीतटीच्या सामन्यामुळे जोर धरत होती. त्याच दरम्यान आयपीएलमधील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने कालचा सोमवारी (ता. 3) चा कोलकाता व बेंगळुरुचा सामना रद्द करण्यात आला होता. स्पर्धा रद्द करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. खेळाडू व सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागत होत असल्याने अखेर आज आय. पी. एल. चा १४ वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी घेतल्याचे बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी ही माहीती दिली. 

      आयपीमधील दोन खेळाडूंना बायो बबलमध्ये असताना कोरोनाची लागन झाली. त्यामुळे सोमवारपासून या १४ व्या हंगाम होणार की नाही याबाबत चर्चा सुरु होती. अखेर बीसीसीआयने हि स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक आयपीएल चाहते नाराज झाले. असे असले तरी खेळाडूंना प्राधान्य देवून बीसीसीआयने स्पर्धा स्थगित केल्याने जाणकारातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सद्यस्थितीला भारतातील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय योग्य असल्याचे दिसून येते.
No comments:

Post a Comment