स्वर्गीय शिवाजीराव देसाई (इनामदार) |
नेसरी / पुंडलिक सुतार - सी. एल. वृत्तसेवा
तळेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील साहेब नावाने परिचित असणारे ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव रावसाहेब देसाई (ईनामदार) वय 83 वर्ष यांचे बुधवार दि १९ मे २०२१ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांचा अल्पपरिचय थोडक्यात..........
स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांचा स्वभाव शांत,सरळ व प्रामाणिक असा होता. भुविकास बँक शाखा कार्वे, गडहिंग्लज, आजरा, मुरगुड, भुदरगड, तासगाव, कुरुंदवाड, गगनबावडा आदी ठिकाणी त्यांनी 30 वर्ष मॅनेजर म्हणून नोकरी केली. शेतीच्या आवडीने ३ वर्ष अगोदरच स्वेच्छानिवृत्ती घेतली. श्री नागमादेवी विकास सेवा संस्थेसाठी व्हॉइस चेअरमन अखेरपर्येंत काम पाहिले. शिवाजी सहकारी बँक नेसरीला त्यांनी शाखा चेअरमन म्हणून ३ वर्ष काम पाहिले. सर्वजन त्यांना आदराने साहेब म्हणून बोलवत असत. तर तत्कालीन आमदार स्व. व्ही. के. चव्हाण पाटील, आमदार स्व. नरसिंगराव पाटील, श्रीपतराव शिंदे, नामदार स्व. बाबासाहेब कुपेकर आदींसह तिन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्यांना जवळून ओळखत असत. सार्वजनिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजाचे कोणतेही काम त्यांना विचारून केले जायचे. तर त्यांच्या शब्दाला सर्वजण मानत असत. त्यांना शेतीची व वृक्षारोपण करण्याची खूप आवड होती. त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती रत्नमाला, मुले उदयसिंह (पोलीस पाटील), सुभाष, सुना सौ. युगंधरा, सौ. धनश्री, मुलगी सौ. वृषाली धैर्यशील जाधव (तिरवडे), नातवंडे कु. तन्वी, कु. तेजस्विनी, कु. रेवती, कु. अथर्व असा परिवार आहे. (उदयसिंह देसाई, पोलीस पाटील, मो. नं. 9421112590)
No comments:
Post a Comment