पाटणे फाटा ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आमदार राजेश पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत जागेची पहाणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2021

पाटणे फाटा ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आमदार राजेश पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत जागेची पहाणी

 

पाटणे फाटा येथे हॉस्पीटल जागेचे पाहणी करताना आमदार राजेश पाटील धनंजय इंगळे , तहसिलदार रणावरे

तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा

            पाटणे फाटा ( ता. चंदगड ) येथील रखडलेले ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी एम.आय.डी.सी मधील जागेची  आमदार राजेश पाटील यांच्या सोबत एम.आय.डी.सी रिजनल अधिकरी धनंजय इंगळे  यांनी पाहणी केली . 
यावेळी  आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले , एम.आय.डी.सी मधील ही जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर प्रत्यक्ष बांधकाम कामाला ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये सुरुवात करण्यात येइल. चंदगड तालूक्यात मध्यवर्ती ठिकाणी एका सुसज्ज ट्रामा केअर हॉस्पीटलची गरज होती . ती लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही आमदार  राजेश पाटील म्हणाले .
यावेळी तहसीलदार विनोद रनवरे. बीडीओ श्री बोडरे ,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ साने  तानाजी गडकरी,पांडुरंग बेनके व अधिकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment